मनसैनिक पत्रकातून जनतेच्या संपर्कात, राज ठाकरेंच्या सूचना

126

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या पदाधिका-यांचा मेळावा शनिवारी पार पडला. 25 मिनिटे झालेल्या या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्यातील पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. यामध्ये राज ठाकरे यांच्याकडून तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांच्याकडून एक पत्र देण्यात येणार आहे. हे पत्र महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवण्याचे काम मनसैनिकांना देण्यात आल्याचे बाळा नांदगांवकर यांनी सांगितले आहे.

सर्व पदाधिका-यांचा राज्यभर दौरा

मनसेचे सर्व पदाधिकारी, नेते, सरचिटणीस आणि उपाध्यक्षांचा राज्यभर दौरा होणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पक्ष नोंदणी देखील करण्यात येणार आहे. त्यासोबतच राज ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रातील जनतेसाठी एक पत्र देण्यात येणार आहे. हे पत्र महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे आदेश मनसेच्या पदाधिका-यांना राज ठाकरे यांनी दिला आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये हे पत्र असेल, अशी माहिती बाळा नांदगांवकर यांनी दिली आहे. हे पत्र लवकरच तयार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः ‘हा शनी महाराष्ट्रातून लवकर दूर व्हावा यासाठी…’, नवनीत राणांचा ठाकरे सरकारवर निशाणा)

निवडणुकांच्या तयारीला लागणार

तसेच महापालिका निवडणुकांच्या बाबतीत सुद्धा जबाबदा-या पक्ष कार्यकर्त्यांना लवकरच देण्यात येणार आहेत. राज्यातील हे दौरे संपल्यानंतर आपण निवडणुकांच्या तयारीला लागणार असल्याचेही बाळा नांदगांवकर यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.