छत्रपतींच्या वंशजांच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न, संभाजीराजेंसाठी मनसेचा शिवसेनेवर हल्ला

177

शिवसेनेने छत्रपती संभाजीराजे यांच्याजागी संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी विचार सुरू केल्यामुळे, संभाजीराजे यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे आता इतर पक्षांनी संभाजीराजेंना पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. मनसेनेही ट्वीट करत संभाजीराजेंना आपला पाठिंबा जाहीर करत, शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील आणि मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत मराठा समाजाला आवाहन केले आहे.

(हेही वाचाः “विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करणं पवारांची जुनी परंपरा”)

राजेंचा मानसन्मान आम्हाला माहीत आहे 

छत्रपतींचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या वंशजांच्या पाठीत खंजीर खुपसायचा ही सेना आणिमहाविकास आघाडीची नीती आहे. राजेंचा मानसन्मान कसा ठेवायचा हे आम्हाला माहीत आहे. मराठा समाजाने आता तरी या कावेबाजांचा डाव ओळखावा, अशा शब्दांत गजानन काळे यांनी शिवसेनेवर आगपखड केली आहे.

(हेही वाचाः ‘आयकर’पाठोपाठ यशवंत जाधवांच्या मागे ‘ईडी’चा फेरा!)

पुण्य आपल्या पदरात पाडून घ्या

राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी? प्रत्येक गोष्टीत राजकारण केलेच पाहिजे का? सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे, असे ट्वीट करत राजू पाटील यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.