यावेळी आम्हाला गृहीत धरू नका, राज ठाकरेंच्या भेटीनंतर मनसेच्या आमदाराचे विधान

88

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आता मतदानाला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक गुप्त मतदानाने होत असल्यामुळे सर्वच पक्षांना एक धाकधूक आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांची गरज असणार आहे. पण आता विधानसभेतील मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचे विधान केले आहे. आम्हाला कोणत्याही पक्षाने गृहीत धरू नये, राज ठाकरे यांनी दिलेल्या निर्णयानुसार मी मतदान करेन, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे मनसेच्या एकमेव मताबद्दल आता सस्पेन्स निर्माण झाला आहे.

(हेही वाचाः भाजपची रणनीती! अजित पवारांच्या भेटीला बावनकुळे; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण)

आम्हाला गृहीत धरू नका 

राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीतही प्रत्येक पक्षासाठी एक-एक मत महत्वाचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपकडून मतांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला जाहीरपणे मतदान केले होते. पण या निवडणुकीत आम्हाला कोणी गृहीत धरू नका. आम्ही भाजपला मतदान करू की दुस-या कोणत्या पक्षाला मतदान करू हे आता सांगता येणार नाही. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने राज ठाकरे यांना विनंती केल्यानंतर आम्ही व्यक्ती बघून मतदान केले होते. लोकशाहीत मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. त्यानुसार प्रत्येक मताला महत्व आहे, असे राजू पाटील म्हणाले.

(हेही वाचाः “मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार!” भाजपच्या अनिल बोंडेंना वाटणारे ‘ते’ मिशीवाले कोण?)

राज ठाकरे यांची लिलावती रुग्णालयात मी रविवारी रात्री भेट घेतली आहे. त्यांनी मला निवडणुकीबाबत काही निर्णय सांगितले आहेत, त्यानुसारचच मी मतदान करेन, असेही राजू पाटील यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.