राज्यसभा निवडणुकीसाठी आता शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्षा आता मतांची जुळवाजुळव करण्यासाठी कामाला लागले आहेत. राज्य विधानसभेत एकमेव आमदार असलेल्या मनसेचे मत नेमकं कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष असतानाच, आता याबाबतीत महत्वाची माहिती समोर येत आहे. मनसेचे आमदार हे भाजपच्या उमेदवारालाच मतदान करणार असल्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. त्यामुळे मनसेचा भाजपला पूर्ण पाठिंबा असून आता शिवसेनेच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचाः राऊतांची हितेंद्र ठाकूरांवर स्तुतीसुमने, राज्यसभेत ठाकूरांच्या बविआचा मविआला होणार फायदा?)
राजू शेट्टींचे मत भाजपला
राज्यसभेत मनसेचे एकमेव आमदार राजू शेट्टी यांचे मत भाजपच्या उमेदवाराला मिळावे यासाठी भाजप आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शीवतिर्थावर भेट घेतली. त्यावेळी या निवडणुकीबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मनसेचे मत भाजपच्या उमेदवाराला मिळावे यासाठी मी राज ठाकरे यांना विनंती केली. राज ठाकरे यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हे मत भाजपला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भाजप उमेदवाराचा विजय सुकर होणार आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत मी त्यांचे आभार मानतो, असे आशिष शेलार यांनी सांगितले.
(हेही वाचाः राज्यसभा निवडणूक : आमदारांची ‘ट्रायडेंट’, ‘ताज’ मध्ये ‘सोय’! भाडे ऐकूण व्हाल थक्क)
शिवसेनेला माकपचे समर्थन
माकपचे राज्य सचिव उदय नारकर यांनी आपल्या आमदाराचे मत शिवसेनेच्या उमेदवाराला देण्याचा निर्णय घेतला आहे. माकपचे एकमेव आमदार विनोद निकोले हे शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करणार आहेत. भाजपला धडा शिकवण्यासाठी आपण महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे नारकर यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community