MNS : मनसेने वाहिली बाळासाहेबांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली!

110
MNS : मनसेने वाहिली बाळासाहेबांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली!
MNS : मनसेने वाहिली बाळासाहेबांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील स्मृतिस्थळावर जावून शिवसैनिकांनी त्यांच्या स्मृतीस  विनम्र अभिवादन केले. मात्र या स्मृतीस्थळावर आजवर कधीही न येणाऱ्या मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने मात्र बाळासाहेबांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात मनसेच्या वतीने दीपोत्सव आयोजित केलेला असून दररोज सायंकाळी विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची  आतिषबाजी याठिकाणी करण्यात येते. मात्र बाळासाहेब यांच्या या स्मृतिदिनी विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी बंद ठेवून मनसेने ही श्रद्धांजली वाहिली आहे. दिवाळीपासून सुरू झालेल्या दीपोत्सवासाठी या मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची थटून गर्दी होत असते.
मनसेच्यावतीने दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात ‘दीपोत्सव 2023’ चं  आयोजन करण्यात आले असून तुळशीच्या विवाहा पर्यंत हा दीपोत्सव चालणार आहे.  मागील गुरुवारी याचा सलीम जावेद यांच्या हस्ते केला गेला. मनसेच्या  या दीपोत्सवाचे हे  अकरावे  वर्ष असून प्रत्येक वर्षी  यात कलात्मक बदल केला जात असून दीपोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी  दरवर्षी याठिकाणी भेट देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र , १७ नोव्हेंबर हा बाळासाहेबांचा  स्मृतिदिन असल्याने या दिवशी या भागातील आकर्षक आणि नेत्रदिपक विद्युत रोषणाई बंद ठेवण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला.

(हेही वाचा-Gram Panchayat : ग्रामपंचायत इमारतीचा निधी वाढविला; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय)

बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन करण्यासाठी मुंबईसह राज्यातून शिवसैनिक शिवाजी महाराज पार्क वर जमा झालेला असल्याने या दुःखाच्या दिवशी विद्युत रोषणाई करणे योग्य ठरणार नाही असा निर्णय घेत ही विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी या दिवशी न करण्याचा निर्धार मनसेने घेतला. त्यामुळं या माध्यमातुन एकप्रकारे बाळासाहेबांना आदरांजली वाहण्याचा प्रयत्न मनसेने केला. त्यामुळे याबाबतचे फलक या मैदान परिसरात लावत त्यांनी याची कल्पना जनतेला दिली.
मात्र मागील गुरुवार पासून सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी या शिवाजी पार्कला सर्व तरुण वर्गाची  एकाच गर्दी  उसळली जात आहे. त्यामुळे शिवाजी पार्कची ही विद्युत रोषणाई ही तरुण वर्गाला भुरळ पाडणारी असून मुंबईच्या काना कोपऱ्यातून संध्याकाळी पाच वाजल्या पासूनच याठिकाणी गर्दी होण्यास सुरुवात होत असते. तसेच नटून थटून काही तरुण तरुणी आणि अबालवृद्धांची पावले शिवाजी पार्क चा दिशेला शुक्रवारीही पडली, परंतु या ठिकाणी विद्युत रोषणाई बंद असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आणि शिवाजी पार्कला फेरफटका मारत सर्व नाराज होत माघारी परतले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.