‘संभाजीनगर’ नावाला समर्थन देत मनसेचा मोर्चा; पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड

92

काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला केंद्राने मंजुरी दिली होती. त्यानंतर केंद्राच्या या निर्णयाविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या पुढाकारातून आंदोलन सुरू आहे. गुरुवारी जलील यांच्या आंदोलनाच्या विरोध करण्यासाठी आणि संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी एमआयएम आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मनसेचा हा मोर्चा अडवला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून सध्या संभाजीनगरमधील गणपती मंदिराबाहेर ही घडामोड सुरू आहे. आजूबाजूच्या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान ७ ते ८ दिवसांपूर्वी मनसेने सदर मोर्चासाठी परवानगी मागितली होती. पण पोलिसांनी ती नाकारली होती. शहरवासियांची नामाकरणाचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मनसेने या मोर्चाला स्वप्नपूर्वी नाव दिले. पण शहागंज परिसरात मनसेचा हा मोर्चा अडवण्यात आला. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी शोकांतिका व्यक्त केली आहे. मनसे कार्यकर्ते म्हणाले की, जर इम्तियाज जलील यांनी कँडल मार्च काढण्यासाठी परवानगी मिळत असेल तर आम्हाला का नाही? छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ मोर्चा काढू दिला जात नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

मनसे नेते प्रकाश महाजन चांगलेच भडकले आणि म्हणाले की, आम्ही राज्य शासनाच्या समर्थनार्थ मोर्चा काढत आहोत. तरीही मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. आम्ही आनंददेखील साजरा करू शकत नाही का? इथले सीपी दुजाभाव करतात. राज ठाकरेंच्या सभेलाही परवानगी देताना खूप त्रास दिला होता. एमआयएमच्या कँडल मार्चला परवानगी दिली होती, पण आमची परवानगी का नाकारली?, असा सवाल उपस्थितीत केला.

(हेही वाचा- जुन्या पेन्शनचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात; संप बेकायदेशीर असल्याचा गुणरत्न सदावर्तेंचा दावा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.