मनसे (MNS) नेते अविनाश जाधव हे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या हटके मनसे स्टाईलमुळे आणि त्यांनी केलेल्या आंदोलनांमुळे जनसामान्यांमध्ये त्यांचा प्रभाव दिसून येत आहे. अशातच अविनाश जाधव यांना मुंब्रामध्ये नो एन्ट्रीची नोटीस देण्यात आली आहे.
( हेही वाचा : “भाकरी ही फिरवावी लागते, नाही तर ती करपते!” शरद पवारांकडून पक्ष संघटनेत बदलाचे संकेत)
नो एन्ट्री का करण्यात आली?
मनसे (MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अनधिकृत मशीद, मजार आणि मदरसांच्या मुद्दयांवर नेहमीच आपली भूमिका मांडली आहे. यामुळे मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातील मुंब्रा येथील वनविभागाच्या जागेवर असणाऱ्या अनधिकृत मशीद, मजार आणि मदरसांचा मुद्दा उपस्थित केला. तसेच या मजारच्या शेजारी मंदिर उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र या दरम्यान मुस्लिमांचा रमजान सुरू झाला. या पार्श्वभूमीवर अविनाश जाधव यांनी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून त्यांना नो एन्ट्रीची नोटीस देण्यात आली होती. ही नो एन्ट्री 23 एप्रिलपर्यंत लागू होती.
यानंतर जेव्हा रमजान महिना संपला तेव्हा मंगळवारी रात्री त्यांनी मुंब्रा येथे हजेरी लावली. पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले. तेव्हा पोलिसांनी आता पुन्हा त्यांच्या मुंब्रामधील नो एन्ट्रीमध्ये वाढ केली आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कलम १४४ कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार २७ एप्रिल रात्री ००.०१ ते ०९ मे २४.०० वाजेपर्यंत पुन्हा एकदा अविनाश जाधव यांना मुंब्रा येथे येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अविनाश जाधव (MNS) काय म्हणाले?
अनधिकृत बांधकामाचा विषय ज्वलंत असून मी हा विषय कधीच सोडलेला नाही. शहरातील सौंदर्य टिकून रहावे हाच माझा उद्देश असून यासंदर्भात वनआधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. कारवाई झाली नसेल तर मनसे स्टाईल पाऊल उचलण्यात येईल असे ते म्हणाले.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community