महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा सोमवार १ ऑगस्ट रोजी १६ वा वर्धापन दिन आहे. मनविसेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून अमित ठाकरे यांनी राज्यातील विविध भागांचा दौरा करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले. मनविसेच्या १६व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे १ ते ७ ऑगस्ट दरम्यान अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत तब्बल १०० महाविद्यालयांमध्ये मनविसे युनिट स्थापन करणार आहेत.
( हेही वाचा : ९ तासांच्या चौकशीनंतर अखेर संजय राऊतांना ईडीने घेतले ताब्यात)
मुंबईत १०० महाविद्यालयांमध्ये मनविसे युनिट स्थापन करणार
१ आणि २ ऑगस्टला अमित ठाकरे यांच्या हस्ते २५ हून अधिक महाविद्यालयांमध्ये मनविसे युनिट फलकाचे अनावरण होणार आहे आणि मुंबईत १०० महाविद्यालयांमध्ये मनविसे युनिट स्थापन करण्यात येणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथेही प्रत्येक जिल्ह्यात मनविसे युनिट स्थापन होणार आहेत. राज्यातील महाविद्यालयात रॅगिंग, छेडछाडचे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत. मनविसेचा कारभार युवा वर्गाच्या हाती राहील याची काळजी घेतली जाईल असे अमित ठाकरेंनी सांगितले.
Join Our WhatsApp Communityमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान मुंबईत १०० महाविद्यालयांत 'मनविसे युनिट ' स्थापन होणार.
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो,
बघता काय? मनविसेत सामील व्हा!#मनविसे #MNVS #MNSAdhikrut pic.twitter.com/gWFHCyUXfO— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 31, 2022