राज ठाकरेंचे रविवारपासून ‘मिशन विदर्भ’!

146

मनसे प्रमुख राज ठाकरे रविवार 18 सप्टेंबरपासून विदर्भाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहे. विदर्भ एक्सप्रेसने सकाळी 8.30 वाजता त्यांचे मुख्य रेल्वेस्थानकावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते रविभवन येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील.

( हेही वाचा : Project Cheetah : ७० वर्षांनी भारतात ‘चीते की चाल’, विशेष विमानाने ८ चित्ते दाखल)

विदर्भ दौरा 

राज ठाकरे अनेक वर्षांनंतर विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2005 मध्ये राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर मनसेची स्थापना झाल्यानंतर जून 2006 मध्ये त्यांनी दौरा केला होता. तसेच 2019 मध्ये वणीला प्रचार दौऱ्यावर आले होते यानंतर मात्र ते प्रथमच विदर्भ दौऱ्यावर येत आहे. राज ठाकरे यांचा दौरा नव्या राजकीय समीकरणाची ही नांदी असल्याचेही बोलले जात आहे. विदर्भातील मनसे संघटन मजबूत करण्यावर भर देण्यासोबतच आघाडीला धक्का देण्याची तयारी ठाकरे यांनी केल्याचे सांगितले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप-मनसे युती होणार की नाही, याबाबत संभ्रम असला तरी आगामी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढल्यास किती बळ मिळेल याची चाचपणी केली जाणार आहे. चंद्रपूर आणि अमरावती या महानगरपालिकांच्याही निवडणुका मनसे पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची माहिती आहे.

मनसेची तयारी 

राज ठाकरे नागपूरला आल्यानंतर चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांचा दौरा ते करणार आहेत. या दौऱ्यात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन ते चर्चा करतील. आगामी महापालिकांच्या निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत पक्षाचा विचार सुरू आहे. इतर पक्षाचे लोक मनसेमध्ये प्रवेश करतील, त्यादृष्टीनेही तयारी सुरू झालेली आहे. या दौऱ्यासाठी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, राज्य उपाध्यक्ष आनंद एंबडवार, अमरावती जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील चार दिवस आधीच नागपूरात आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.