अयोध्येतील बाबरी पाडली तेव्हा शिवसैनिक नव्हते असे वक्तव्य भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी केल्यावर राजकीय वर्तुळातून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या या विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याबाबत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता मनसेकडून सुद्धा राज ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
( हेही वाचा : पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड! गाड्या अर्धा तास उशिराने; वेळापत्रक कोलमडले प्रवाशांचे हाल)
व्हिडिओमध्ये नेमके काय?
या व्हिडिओद्वारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका जुन्या प्रसंगाविषयी सांगत आहेत. राज ठाकरे यात म्हणत आहेत, “मला तो प्रसंग आजही आठवत आहे, जेव्हा बाबरी पाडली होती तेव्हा दीड ते दोन तासांनी एक फोन आला होता आणि त्या फोनवरील व्यक्तीने बाळासाहेबांना एक प्रश्न विचारला होता की, इथे जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नाही…भाजपचे सुंदरलाल भंडारी म्हणत आहेत, ही गोष्टी आमच्या भाजपच्या लोकांनी केली नसून हे शिवसैनिकानी केले असावे. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते, ते जर शिवसैनिक असतील, तर त्यांचा मला अभिमान वाटतो. प्रश्न असा आहे की, त्यावेळी जबाबदारी अंगावर घेणं ही महत्त्वाची गोष्ट होती असे राज ठाकरेंनी भाषणात नमूद केले आहे.” हा जुना व्हिडिओ मनसे अधिकृतवर ट्विट करण्यात आला आहे.
ट्विटचे कॅप्शन
तसेच अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी राजसाहेबांनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा! असे कॅप्शन या ट्विटला देण्यात आले आहे.
https://twitter.com/mnsadhikrut/status/1645710956071116800
Join Our WhatsApp Community