औरंगाबादमध्ये तुफान राडा, PFI संघटनेचं कार्यालय फोडण्याचा मनसैनिकांचा प्रयत्न

देशविरोधी कट रचल्याचा आरोप असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या सदस्यांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. पीएफआय या संघटनेवर देशभरात कारवाई करण्यात आली आहे. अशातच पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पीएफआयच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद येथील पीएफआयच्या कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

(हेही वाचा – या ‘संकटग्रस्त’ पक्ष्यानं अवघ्या ५ दिवसांत पार केलं सायबेरिया ते मुंबईचं अंतर)

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते रविवारी सकाळी शहरातील जिन्सी भागातील पीएफआय कार्यालयावर जाऊन धडकले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यलय फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी औरंगाबादमध्ये एकच गोंधळ उडाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, पुण्यातील पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाबाजीचे राजभरात पडसाद उमटताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहेय औरंगाबाद किराडपुरा भागात मनसे सैनिकांनी पीएफआय संघटनेचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांचा पीएफआय कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here