निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) हा अजित पवार यांचाच आहे, असा निर्णय दिला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यावर आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अजित पवार यांचा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर हक्क मिळवल्यावर अजित पवारांनी टीका केली होती.
‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का?
वाह रे पट्ठ्या…! 🤨 pic.twitter.com/ZXcOk6y6oy
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024
अजित पवार यांचा शिवसेनेतील फुटीनंतरचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते शिवसेना खिशात घालणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमक होती तर नवा पक्ष काढण्याचा सल्ला देताना दिसून येत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) हा अजित पवार यांना मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध नेते व पक्षांनी या निर्णयावर आपापली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही अजित पवार यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात अजित पवार शिवसेना खिशात घालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करताना दिसून येत आहे. ‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का?, असा सवालही मनसेने आपल्या ट्विटमध्ये अजित पवारांवर निशाणा साधताना उपस्थित केला आहे.
काय म्हणाले अजित पवार त्या व्हिडिओत?
या व्हिडिओमध्ये अजित पवार यांचे भाषण आहे, त्यात ‘ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला.. ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला…शिवाजी पार्कवर काढलेला पक्ष महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवला…त्यांच्याच पक्ष काढून घेतला…त्यांचेच चिन्ह काढून घेतले. ते निवडणूक आयोगाने दिले असले तरी ते जनतेला पटले आहे का? याचाही विचार झाला पाहिजे. अरे मग तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष कुणी अडवले होते?
Join Our WhatsApp Community