‘‘अन् माझे दुसरे बारसे ‘राज’ या नावाने झाले’’; सुबोध भावेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंचे उत्तर, म्हणाले…

83

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटासाठी आवाज दिला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनी रविवारी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. तसेच, ‘राज’ या नावाने आपले दुसरे बारसे झाल्याचेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

… म्हणून केवळ ‘राज’ हे नाव लावतो

या मुलाखतीदरम्यान, सुबोध भावे यांनी तुमचे खरे नाव स्वरराज, मग आता केवळ राज का लावता? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, राज ठाकरे म्हणाले की, माझ्या वडिलांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी संगीतात काहीतरी करेन, अशी अपेक्षा त्यांना होती. त्यांनी माझ्याकडून अनेक वाद्ये वाजवून घेण्याचा प्रयत्न केला. मी स्वरराज नावाने व्यंगचित्र काढायचो. मात्र, एके दिवशी “मी बाळ ठाकरे” या नावाने व्यंगचित्र काढायला सुरुवात केली. तू राज ठाकरे या नावाने सुरुवात करायची, असे मला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर काॅलेजमध्ये असताना, माझे दुसरे बारसे राज या नावाने झाले, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

( हेही वाचा: मराठा क्रांती मोर्च्याचे रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न; ‘या’ रुग्णालयात उपचार सुरु )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.