महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे हे उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. पायाचे दुखणे वाढल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. मात्र, राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने आता शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव सचिन मोरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कोविडच्या डेड सेलमुळे अॅनेस्तेशीया देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डाॅक्टरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
( हेही वाचा: प्रसिद्ध गायक केके यांचे निधन, कोलकात्यातील लाईव्ह शोदरम्यान ह्रदयविकाराचा झटका )
मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांना पायदुखीचा त्रास जाणवत होता. मात्र शस्त्रक्रियेआधीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने सध्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत शस्त्रक्रिया होणार नाही, अशी माहिती डाॅ. जलील पारकर यांची दिली आहे.
Join Our WhatsApp Community