अशोक सराफ हे सिनेसृष्टीतील असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांचे चाहते विविध वयोगटामध्ये आहेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत चाहतावर्ग कमावलेल्या अशोक मामांनी गेल्यावर्षी पंचाहत्तरी गाठली. तर गेली 50 वर्षे ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. बाॅलिवूड आणि मराठी सिनेविश्वात तसेच नाट्यसृष्टीत त्यांनी नाव कमावले आहे. राजकीय मंडळीही अशोक मामांचे चाहते आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही अशोक सराफांशी चांगले ऋषानुबंध असून, एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरेंनी असे म्हटले की, अशोक सराफ दक्षिणेत असते तर आज तिथे ते मुख्यमंत्री झाले असते.
पुण्यात अशोक पर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभिव्यक्ती प्रस्तुत आणि रावतेकर आयोजित या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या सांगता समारंभात राज ठाकरे बोलत होते. अशोक सराफांची पंचाहत्तरी आणि त्यांची सिनेविश्वात पूर्ण झालेली 50 वर्षे यानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रशांत दामले, निवेदिता सराफ, राजेश दामले आणणि अमोल रावतेकर उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक सराफांचा सन्मान करण्यात आला.
( हेही वाचा: गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहचले? मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘तो’ किस्सा )
अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमांवर प्रभाव
राज ठाकरे म्हणाले की, ज्या व्यक्तीला आपण लहान असल्यापासून आजपर्यंत पाहत आलो, त्या व्यक्तीने ‘हा माझा आवडता’ हे सांगण भरुन पावण्यासारखे आहे. मी त्यांचे कितीतरी सिनेमे, नाटक पाहिली असतील. माझ्या मते, ते एकमेव अभिनेते असावेत की समोर कोणीही असले तरी अशोक सराफांना फरक पडला नाही. चित्रपटात किंवा नाटकात असो त्यावर त्यांचा प्रभाव असायचा.
Join Our WhatsApp Community