जबाबदारी झेपत नसेल तर पद रिकामे करा; राज ठाकरेंनी मनसे पदाधिका-यांना खडसावले

196

आगामी मुंबई महानगरपालिका तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांची मंगळवारी बैठक घेतली. निवडणुकांसाठी आतापासूनच कामाला लागा, जबाबदारी झेपत नसले तर पद रिकामे करा, अशा शब्दांत त्यांनी पदाधिका-यांना खडसावले. विद्यापीठाची सिनेट निवडणूक होणार असून, यासाठी नोंदणीचा वेग वाढवण्याची सूचना मुंबईतील विभाग अध्यक्षांना त्यांनी दिली.

पदाधिका-यांना राज ठाकरेंची तंबी

वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे पार पडलेल्या या बैठकीला मनसेचे सर्व नेते, सरचिटणीस यांच्यासह मुंबईतील विभाग अध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना, राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे, त्यानुसार सर्व पदाधिका-यांनी आपल्या कामाला सुरुवात करा, असे सांगितले. या निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या काळात मुंबईत आणि कोकणात मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्याची माहितीही पदाधिका-यांना देण्यात आली. बैठकांना वारंवार अनुपस्थित राहणा-या पदाधिका-यांनाही यावेळी तंबी देण्यात आली असून, यापुढे असा प्रकार सहन केला जाणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

( हेही वाचा: महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद: महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.