ठाण्याला झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे राज्यभरात भोंग्यांवरुन वादंग निर्माण झाला आहे. ठाण्यातील उत्तर सभेत दिलेल्या अल्टिमेटमनंतर, हनुमान जयंतीनिमीत्त पुण्यात महाआरती आणि त्यानंतर आता रविवारी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. त्यामुळे आजच्या (रविवार) पत्रकार परिषदेत राज ठाकरे नेमक काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राऊतांचा समाचार घेणार?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका करत निशाणा साधला होता. नवहिंदुत्ववादी ओवेसी’ असे संबोधत त्यांनी टीका केली होती. त्यामुळे रविवारच्या या पत्रकार परिषदेत राज ठाकरे राऊतांचा समाचार घेण्याची शक्यता आहे. तसेच, त्यांची भूमिका काय असणार आहे हेही राज ठाकरे स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
( हेही वाचा: लोडशेंडींगबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची महत्त्वाची माहिती, म्हणाले… )
भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता
तसेच, भोंगे उतरवण्याच्या राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी धूडकावून लावले आहे. त्यामुळे भोंग्यांवर आता राज ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community