MNS : राज आए दुरुस्त आए…

326
MNS : राज आए दुरुस्त आए...
MNS : राज आए दुरुस्त आए...
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

गुढी पाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पाडवा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे झाला. राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. ‘हिंदुस्थान पोस्ट’मध्ये ’राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख होतील का?’ या मथळ्याच्या लेखात आपण राज ठाकरेंचं युतीमधलं स्थान काय असणार आहे, इत्यादी बाबी स्पष्ट केल्या होत्या. त्यामुळे ठाकरेंच्या ‘बिनशर्त पाठिंबा’ या शब्दांनी मला तरी धक्का बसलेला नाही. जोगेश्वरीमधील माझे मित्र मनसेचे (MNS) कार्यकर्ते, नगरसेवकाची निवडणूक लढवलेले विलास म्हेतर यांनी ६०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याशी माझी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) अनेकदा चर्चा झाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) हिंदुत्व हाती घेतील हे मी त्यांना अनेकदा सांगितले होते. विलास हे राज ठाकरेंचे निस्सिम भक्त आहेत. तरी देखील त्यांच्यावर (त्यांच्यासारख्या अनेकांवर) १८ वर्षांनंतर पक्ष सोडण्याची पाळी आली. ती का आली, याचा विचार शीर्ष नेतृत्व करणार नाही.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडव्याच्या सभेमध्ये स्पष्ट म्हटलं की ते कुणाच्याही हाताखाली काम करु शकत नाहीत. कारण ते ठाकरे आहेत. पण हे ठाकरेपण (मोठेपण) स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची अनुमती देत नाही. स्वतःचं मूल्यांकन करण्याची परवानगी देत नाही. असे कौटुंबिक पक्ष जेव्हा मोठे असतात, तेव्हा फारशी अडचण येत नाही. मात्र लहान कौटुंबिक पक्षाच्या कार्यकर्त्यांची कोंडीच होते. इथे वर्षानुवर्षे निर्णय घेणारी व्यक्ती एकच असते, एकाच कुटुंबातली असते. त्यामुळे बदल हा कार्यकर्त्यांमध्ये नव्हे तर शीर्ष नेतृत्वामध्ये घडवायचा असतो.

(हेही वाचा – Salman Khan House Firing : लॉरेन्सच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांची मदत)

राज ठाकरे (Raj Thackeray) एकला चलो रे असं अनेकदा म्हणाले आहेत. कारण त्यांच्यामते ते एकटेच समर्थ आहेत. पण असं नसतं, कुणी मनसेला (MNS) सोबत घ्यायला तयार नव्हतं. शरद पवारांनी (Sharad Pawar) २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीत मनसेकडून (MNS) फायदा घेण्याचा प्रयत्न केला. फायदा झाला नाही असं समजताच पुन्हा त्यांना विचारलं देखील नाही. ‘लाव रे तो व्हिडिओ’ हे प्रकरण म्हणजे राष्ट्रवादीला दिलेला बिनशर्त पाठिंबा होता. राज आता कितीही म्हणत असले की मी मोदींवर पातळी सोडून टिका केली नाही, तरी त्यांचे जुने व्हिडिओ उपलब्ध आहेत. इतकंच काय तर त्यांनी मोदींच्या समर्थकांसाठी ‘लावारीस’ असा गलिच्छ शब्द वापरला होता. ‘भक्तांना घरात घुसून मारा’ ही भाषा देखील राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आहे. आता हा भूतकाळ झालेला आहे. राज ठाकरे हे युतीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांना शिवसेनाप्रमुख वगैरे बनवण्यात येणार नाही, हे त्यांनीच स्पष्ट केलं आहे.

राजकीय कारकिर्दीनुसार राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अतिशय चांगले पाऊल उचलले आहे. इतकी वर्षे ते संधीच्या शोधात होते. शरद पवारांनी २०१९ मध्ये मनसेचा (MNS) वापर केला. पण त्यामुळे मनसेचे नुकसान झाले. मोदींविरोधात प्रचार केल्यामुळे मनसेची उरलेली शक्तीही क्षीण झाली. पण त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी ‘मी एकटा लढेन’ असं म्हणत असताना आघाडी किंवा युतीत जागा मिळतेय का, हे पाहणं राजकीय धर्मच आहे. त्यात पूर्वी उद्धव ठाकरे युतीत असल्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे युतीत येण्याचे दरवाजे बंद झाले होते. आता उद्धव आघाडीत गेले. त्यामुळे राज यांचा युतीत येण्याचा मार्ग मोकळा झाला. पवारांप्रमाणे अमित शाह राज ठाकरेंना (Raj Thackeray) फसवणार नाहीत. विधानसभेत मनसेचे (MNS) ५-६ आमदार निवडून येतील. पालिकेच्या निवडणुकीत त्यांना पूर्वीचे बरे दिवस येतील. या समीकरणामुळे अमित ठाकरे तयार होईपर्यंत पक्ष तग धरुन राहिल आणि भाजपाच्या दृष्टीने ठाकरे या नावामुळे जे काही थोडं फार नुकसान झालं असतं, ते टळेल. थोडक्यात राज ठाकरे तिकडून इकडे यायला उशीर झाला, मात्र राज आए, दुरुस्त आए!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.