माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजार हटवण्यात आल्यानंतर आता मनसेने आपला मोर्चा ठाणे-मुंब्रा परिसरात वळवला आहे. माहीमप्रमाणे ठाणे-मुंब्र्यामधील अनधिकृत मशिदींवर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
( हेही वाचा : राज्यात लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी सरकार विचाराधीन उपमुख्यमंत्र्यांची माहिती)
अनधिकृत मशिदींवर येत्या १५ दिवसात कारवाई झाली नाही तर त्या परिसरामध्ये मंदिर उभारू असा इशारा मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. मुंब्रा येथील डोंगरावर अनधिकृतपणे मशिद बांधण्यात आली आहे. यावर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.
…अन्यथा मंदिर बांधण्याचा इशारा
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी स्क्रिनवर माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजार दाखवली तसेच याठिकाणी लोक कसे ये-जा करतात याचे संपूर्ण दृश्य दाखवण्यात आले. या ठिकाणी दुसरं हाजीआली तयार होत असल्याचा आरोप करत प्रशासनाचे दुर्लक्ष असेस तर अशाप्रकारचे अनधिकृत बांधकाम तयार होते असा आरोपही त्यांनी केला. यानंतर या बांधकामावर प्रशासनाने कारवाई केली.
याचप्रकारे ठाणे-मुंब्रा परिसरात सध्या झपाट्याने अनधिकृतरित्या मशिदीचे बांधकाम करण्यात येत आहे. यासंदर्भात मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. यावर कारवाई न झाल्यास येत्या १५ दिवसांनंतर तेथे मंदिर बांधण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community