महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुढी पाडवा मेळावा येत्या ९ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होत असून राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “मला आपल्याशी बोलायचं आहे”, अशी साद घातली असून यासंदर्भात त्यांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट केली आहे. (Raj Thackeray)
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या अधिकृत हँडलवरुन गुढी पाडव्याच्या मेळाव्याचा ट्रेलर लॉन्च केला आहे. “९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे!”, अशा कॅप्शनसह त्यांनी गुढी पाडवा मेळाव्याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. (Raj Thackeray)
९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय… हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे ! #मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally pic.twitter.com/OgImzXTSQX
— Raj Thackeray (@RajThackeray) April 5, 2024
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जावयाने बांधले गुडघ्याला बाशिंग)
राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी दुसऱ्या पक्षांसोबत युती आणि आघाडी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील महायुतीत सामील होणार अशा चर्चांना उधाण आले असताना त्या संदर्भात अद्याप कोणतीही घडामोड झालेली नाही. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिल्लीत भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, त्यानंतर मुंबईत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासोबत चर्चा केली होती. तेव्हापासूनच मनसे महायुतीत सामील होणार या चर्चांना उधाण आले होते. मात्र याबाबत अद्याप युतीचा निर्णय झाला नाही आणि राज ठाकरेंनी (Raj Thackeray) देखील निवडणुकीसंदर्भात अद्याप घोषणा केली नाही. या पार्श्वभूमीवर गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Raj Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community