राज्यातील महापालिका निवडणुकांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठं वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. राज्यातील महापालिका निवडणुका लवकर घ्या, असे राज ठाकरेंनी वक्तव्य केले आहे.
(हेही वाचा – दिल्ली पुन्हा हादरली! १२ वीच्या विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला, बघा CCTV फुटेज)
ठाण्यातील एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी शासकीय निवासस्थानी राज ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. यासंवादादरम्यान राज ठाकरेंनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्षकेंद्रित केले. विशेष म्हणजे राज्यात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात. कारण गेल्या काही वर्षांपासून महापालिकांवर तीन-तीन वर्षांपासून प्रशासक कामकाज पाहत आहेत. जर लोकप्रतिनीधी नसतील तर जे प्रशासकीय अधिकाऱ्यावर वचक राहणार नाही. त्यामुळे शहरांचा विकास होत नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिले, नसल्याचे मत राज ठाकरेंनी व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे असेही म्हणाले की, लोकांचे प्रश्न, समस्या सोडवणारे लोकप्रतिनिधी महापालिकेत नसतील तर समस्या सुटणार कशा, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. यासह निवडणुकीत असणारी पॅनल सिस्टिम योग्य नाही. वॉर्डात काम झाले नाही तर कोणाला जबाबदार धरणार? निवडणुकीत पूर्वी वापरण्यात येणारी सिस्टिम योग्य होती. तर पॅनल सिस्टिम ही राजकीय पक्षांची सोय असल्याचे सांगत राज ठाकरेंनी प्रभाग समिती पद्धतीवरही टीका केली.
Join Our WhatsApp Community