अफझल खानाची कबर जमीनदोस्त! राज ठाकरेंनी शिंदे – फडणवीस सरकारचे केले अभिनंदन

125

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफझल खानाची अनधिकृतपणे पसरलेली कबर जमीनदोस्त केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले आहे. मनसे अध्यक्षांनी या कामगिरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन केले आहे.

( हेही वाचा : अदानीनंतर हिंडनबर्ग रिसर्चचा नवा अहवाल! नव्या रिपोर्टमधून काय गौप्यस्फोट करणार? )

शिंदे – फडणवीस सरकारचे केले अभिनंदन

मनसे अधिकृत या ट्विटर पेजवर यासंदर्भातील अभिनंदनाचे ट्वीट करण्यात आले आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्ते आल्यावर त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अनधिकृत पसरलेल्या अफझल खानाच्या कबरीचे बांधकाम तोडून ती कबर पुन्हा पूर्वस्थितीत आणली याबद्द सरकारचे अभिनंदन” असे ट्विट करत मनसे अधिकृतवरून सरकारचे अभिनंदन करण्यात आले आहे.

https://twitter.com/mnsadhikrut/status/1638739845895049218

अन्यथा…आम्ही आहोतच

दरम्यान राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सांगलीतील बेकायदा बांधकामावर सुद्धा भाष्य केले याबाबत सुद्धा ट्वीट करण्यात आले आहे. हिंदूंची मोकळी जागा बळकावून अनधिकृत मस्जिद बांधणाऱ्या धर्मांध मुस्लिमांना चाप लावा अन्यथा…आम्ही आहोतच असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

https://twitter.com/mnsadhikrut/status/1638747143832842240

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.