मनसे आक्रमक: जिथे अजान तिथे जय हनुमान

83

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेमध्ये मशिदींवरील भोंग्यांवरुन दिलेला अल्टीमेटम 3 मे मंगळवारी संपला. त्यानंतर बुधवारी 4 मे पहाटेपासून मनसैनिक आक्रमक झाले आहेत. ज्या ज्या मशिदींमधून अजानचा आवाज भोंग्यावरुन ऐकू येत आहे, त्या त्या ठिकाणी मनसैनिकांनी लाऊड स्पीकर लावत हनुमान चालिसाचे पठण करायला सुरुवात केली आहे.

मुंबईतील अनेक भांगात मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आले. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे.

या ठिकाणी लाऊड स्पीकर लावत हनुमान चालिसा पठण

मुंबई, नवी मुंबई तसेच नाशिक या भांगात अनेक मशिदींसमोर भोंग्यांवरुन हनुमान चालिसा पठण मनसैनिकांकडून करण्यात आले. सध्या या ठिकाणांहून अनेक मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. ठाणे, मुंबई चारकोप आणि जळगाव येथेही भोंग्यावरुन हनुमान चालिसेचे पठण मनसैनिकांनी केले.

जळगावमध्ये हनुमान चालिसा

बुलढाण्यातील खामगाव शहरातल्या चांदमारी भागातील हनुमान मंदिरात जाऊन पोलिसांनी लाऊडस्पिकर मशीन ताब्यात घेतल्याची घटना घडली. तर जळगाव जामोदमध्ये पोलीस बंदोबस्तात हनुमान चालीसा पठण करण्यात आले. जळगाव शहरातील भिल्पुरा पोलीस चौकीजवळ असलेल्या शनी मंदिर परिसरात मंगळवारी हनुमान चालीसा लावण्यासाठी आवाजाची चाचणी घेताना, मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेऊन त्यांना नोटीस बजावल्या होत्या आणि कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं.

( हेही वाचा: मनसे इफेक्ट: राज्यात ‘या’ ठिकाणी भोंग्यांविनाच अजान, अशी आहे स्थिती )

हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला

नाशिकमध्ये मनसैनिकांकडून हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. जुने नाशिक परिसरातील जबरेश्वर मंदिरात हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. स्पीकर, वायर आणि इतर साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.