मनपा निवडणुकीत राज ठाकरेंचा ‘वन मॅन शो’!

147

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये बैठक झाली. यावेळी महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मनसे कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले. तर महापालिका निवडणुकीसाठी मनसेने स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच युतीच्या चर्चेत पडू नका, स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा , असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंचा ‘वन मॅन शो’ पाहायला मिळणार आहे.

(हेही वाचा – नितेश राणे अखेर जाणार शरण, उच्च न्यायालयातील जामीन अर्ज घेतला मागे )

राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आणि रणनिती संदर्भात मनसेची बैठक बोलवण्यात आली होती. मुंबईत झालेल्या या बैठकीला मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे आणि नाशिक येथील पक्ष पदाधिकारी उपस्थितीत होते. मनसे आणि भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या पातळीवर युतीबाबात वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा आहे. भाजप-मनसेची ही युती छुप्या पद्धतची असणार आहे, असे सांगितले जात आहे. दरम्यान, आजच्या या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

गेल्या काही दिवसांपासून मनसे भाजप युतीच्या चर्चा होत्या. आपण एकटे लढण्याची तयारी करावी, असे आदेश मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी दिली. आपली स्वबलाची तयारी असली पाहिजे. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना असेही सांगितले की, तुमच्या मनात विषय येत असेल, युतीचं काय होणार, युती होईल की नाही, ते पुढे बघू, तुमची स्वतंत्र लढण्याची तयारी असली पाहिजे. युती होण्याच्या चर्चेत पडू नका, निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागा, असा आदेशच राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत. या बैठकीत विधानसभावर कमिटी नेमली जाणार असून या कमिटीकडून अहवाल तयार करण्यात येणार आहे आणि त्या सोबतच राज ठाकरे लोकसभावार आढावासुद्धा घेणार आहेत.

कोणत्याही पक्षासोबत युती नको

यावेळी संदीप देशपांडे म्हणाले, विधानसभा लोकसभावार कमिटी स्थापन करून बैठका घेणार आहे. यावेळी गटाध्यक्षांच्या बैठक घेणार आहे. कमिटी १५ फेब्रुवारीपर्यंत अहवाल देणार असून भाजपासोबत किंवा अन्या कोणत्याही पक्षासोबत युती नको असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी करण्याचे आदेश मिळाले आहेत. शिवसेनेने प्रभागरचना जरी बदलली तरी लोकांची नाराजी बदलणार नाही, असा निशाणाही त्यांनी साधला. पुढे ते म्हणाले, शिवसेनेसोबत मराठी माणसं, हिंदू लोकं आहेत का? कितीही प्रभाग रचना बदलल्या तरीही ते आजचं मरण उद्यावर ढकलंत आहेत, पण मरण अटळ आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही महाविकास आघाडी विरोधातील लढा असणार आहे. मुंबईचे महत्व कमी करणे कोणाच्या बापाला जमले नाही आणि यापुढे जमणार नाही, असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.