सोशल मीडियात पक्षाविषयी बोलाल, तर पक्षातून बाहेर जाल; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना दम

127

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या आणि नंतर काय घाण करायची ती करा अशा शब्दांत मनसैनिकांना सुनावले आहे. इतकेच नाही तर त्यांनी पक्षातून हकालपट्टी केली जाईल, अशा इशाराही दिला आहे. राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्र लिहिले आहे.

राज ठाकरे काय म्हणाले पत्रात? 

  • सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाटेल ते बोलायचे, प्रसिद्धी मिळवायची असे करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स यामुळे हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचे काय करावे हे त्यांनी ठरवावे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही, असे राज ठाकरेंनी ठणकावले आहे.
  • माझ्या पक्षातल्या कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणे मांडायचे असेल तर संबंधित नेत्याशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचे असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या. मग त्यानंतर काय करायची असेल ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा, ही समज नाही, तर अंतिम ताकीद आहे याची नोंद घ्या, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

(हेही वाचा विनाअनुदानित शाळांचा प्रश्न, भीक, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे! विधानसभेत खडाजंगी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.