मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून ते दौऱ्यादरम्यान अनेक नेते, पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. दरम्यान, राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युती होणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. मात्र राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले बावनकुळे
विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी बावनकुळे यांची कोराडी निवास्थानी येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या भाजपकडून एकनाथ शिंदे, आठवले गटासह एनडीएतील घटक पक्षांसोबत चर्चा सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात इमानदारीने चालणारी शिवसेना आणि आम्ही युतीत निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर सध्या तरी मनसेसोबत युतीची चर्चा सुरू नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले.
(हेही वाचा – कराटे ट्रेनिंगच्या नावाखाली PFI तयार करत होते दहशतवादी, NIA ने केला पर्दाफाश)
राज ठाकरे यांच्या भेटीबाबत बावनकुळे यांनी सांगितले की, मी जेव्हा मुंबईत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो, तेव्हा त्यांना घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. नागपुरात आल्यावर चहा घ्यायला घरी या अशी विनंती केली होती, त्यामुळे आज ते घरी आले असल्याचे बावनकुळेंनी यांनी सांगितले. आज झालेल्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ नसून यावेळी राजकीय चर्चा होणार नसून आमचे घर हे राजकीय चर्चा करण्याचे ठिकाण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community