राज ठाकरे 29 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर, मनसैनिकांना कोणता कानमंत्र देणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते सर्कीट हाऊसमध्ये मनसे शहर जिल्हा कार्यकारणी आणि पदाधिकारी यांच्यासह बैठक होणार आहे. यानंतर बुधवारी सकाळी १० वाजता राज ठाकरे करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शनही घेणार आहेत. यानंतर दुपारी ते सावंतवाडीकडे रवाना होऊन पाच वाजता तेथे पोहोचतील आणि त्या दिवशीचा मुक्काम ते कुडाळ येते करतील. कोल्हापूरनंतर ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान राज ठाकरे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यावर असताना राज ठाकरे मनसैनिकांसह पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.

(हेही वाचा – Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची होणार चौकशी?)

अशातच राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आज, शुक्रवारी बांद्रा एमआयजी क्लब येथे बैठक बोलावली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली आहे. मुंबईतील लोकसभा निहाय परिस्थितीचा राज ठाकरे आढावा घेणार असून ते मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. यावेळी २७ नोव्हेंबर रोजी मुंबईत मनसे गट नेत्यांचा जो मेळावा होणार आहे. याच्याही तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान, मनसेने निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. तर राज्यात लवकरच निवडणुका लागतील असे भाकितही राज ठाकरेंनी केले होते. यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. अशातच मुंबईतील परळमधील कामगार मैदानात मनसे तर्फे कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्यांनी असे म्हटले होते की, मी आता भाषणाला उभा नाही. मी सध्या घशाला आराम देतो. कारण जानेवारीपासून बोंबलायचंच आहे. निवडणुका लागतील. घसा एवढ्यासाठीच बोललो कारण गळा हा लता मंगेशकर वगैरे या लोकांसारखा असतो. घसाच आपला असतो. त्यामुळे घशाला जरा आराम देतोय.., असे राज ठाकरेंनी म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here