नोटांवरील फोटोवरुन मनसेने केली भूमिका स्पष्ट! म्हणाले, “… हे फालतू राजकारण”

147

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर याप्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. अशातच सर्व राजकीय पक्ष याबाबत आपली प्रतिक्रिया देताना कोणाचा फोटो नोटांवर असला पाहिजे हे सांगताना दिसताय. थोडक्याच राजकीय वर्तुळात नोटांवर गांधींच्या जागी इतर नेत्यांचे फोटो लावण्यावरून चढाओढ सुरू असल्याचे दिसतेय. मात्र यासंदर्भात मनसेने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

(हेही वाचा –शिंदे-फडणवीसांची राज ठाकरेंशी जवळीक वाढल्याने रामदास आठवले अस्वस्थ?)

सुरू असलेल्या नोटांवरील फोटोच्या राजकारणादरम्यान, मनसेची भूमिका काय आहे याबाबत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनसेची भूमिका मांडली आहे. राजू पाटील यांनी ट्वीट करत पायाभूत सुविधांवर भर देण्याची विनंती करत सुरू असलेला सर्व प्रकार फालतू राजकारण असल्याचे म्हटले आहे.

काय आहे मनसेचे ट्वीट

सध्याचे राजकारण पाहून जनता NOTA वापरायच्या मुडमध्ये आहे. त्यापेक्षा महागाई कमी करा. शेतकरी बांधवांना दिलासा द्या. रस्ते चांगले करा. चांगली शिक्षण व आरोग्य व्यवस्था उभी करा. रूपया मजबूत करा. उगीचच कशाला त्या नोटा आणि फोटोंच्या मागे लागलाय? सामान्यांना याचा काय फायदा? फालतू राजकारण’ असे राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, भाजपचे राम कदम यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे फोटो नोटेवर छापण्यात यावे अशी मागणी केली आहे. यासंदर्भात राम कदम यांनी केलेले ट्वीट देखील चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे राम कदमांचे ट्वीट

राम कदम यांनी जे ट्वीट केले त्यामध्ये पाचशेच्या नोटांचे चार फोटो शेअर केले आहेत. एका फोटोवर छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या फोटोवर बाबासाहेब आंबेडकर, तिसऱ्या फोटोवर सावरकर तर चौथ्या फोटोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी. अशा चार नोटांचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच अखंड भारत.. नया भारत.. महान भारत.. जय श्रीराम .. जय मातादी! अशी कॅप्शन दिली आहे. त्यांचे हे ट्विट व्हायरल होत असून ते चर्चेत आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.