महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबद सभेला अखेर औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे १ मे रोजी मनसेची सभा निश्चित होणार आहे. पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला अधिकृत परवानगी दिली नसली तरी पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. तरी राज ठाकरेंच्या सभेला काही अटी – शर्ती घालून देण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रत्युत्तर सभेची मनसेकडून जय्यत तयारी सुरू
औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून देखील या सभेच्या दिवसाकरता बंदोबस्ताचा प्लान तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. औरंगाबादेत १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रत्युत्तर सभा होणार आहे. प्रत्युत्तर सभेची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात सगळीकडे मनसेचे झेंडे लावण्याची आणि कार्यक्रम पत्रिका घरोघरी वाटपाची मनसैनिकांनी तयारी सुरू केली आहे.
राज ठाकरे या अटी-शर्तींचे पालन करणार?
(हेही वाचा – राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेची खास निमंत्रण पत्रिका तयार; भगवे वस्त्र, हनुमान अन्…)
१ ) मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून कोणतेही विधान करू नये
२ ) सामाजिक सलोखा बिघडेल, असे कोणतेही वर्तन करण्यात येऊ नये
३ ) सभेपूर्वी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही
४ ) लहान मुले, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी
५ ) सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करण्यास परवानगी नाही
६ ) इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
७ ) सभेदरम्यान कोणत्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही
८ ) व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी
९ ) सभेला येणार्या लोकांनी घोषणा नारेबाजी देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल
१० ) वाहन पार्किंगचे नियम पाळावे
(हेही वाचा – मनसेची १ मे रोजी औरंगाबादेत सभा; २९, ३० एप्रिलला राज ठाकरे कुठे असणार?)
Join Our WhatsApp Community