“मराठी माणसाला डिवचू नका!” राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा

96

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई-ठाणे या शहरांतून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर मुंबईकडे पैसेच उरणार नाही, मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त विधान मुंबईतील एका कार्यक्रमात केल्यावर आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

( हेही वाचा : ज्या विषयात कळत नाही, तिथे राज्यपालांनी चोमडेपणा करु नये; राज्यपालांच्या वक्तव्यावर मनसे आक्रमक )

आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात

आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? असा सवाल राज ठाकरेंनी राज्यपालांना केला आहे.

मराठी माणसाला डिवचू नका

उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका असा इशारा राज ठाकरेंनी राज्यपालांना दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.