Raj Thackeray : उत्सव साजरा करा पण सामाजिक भान ठेवा काय म्हणाले राज ठाकरे त्यांच्या पोस्ट मध्ये

याबाबत लवकरच ते सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. पण एकूण सरकारने आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन यावर विचार आणि कृती करायला हवी असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

131
Raj Thackeray : उत्सव साजरा करा पण सामाजिक भान ठेवा काय म्हणाले राज ठाकरे त्यांच्या पोस्ट मध्ये
Raj Thackeray : उत्सव साजरा करा पण सामाजिक भान ठेवा काय म्हणाले राज ठाकरे त्यांच्या पोस्ट मध्ये

राज्यात नुकतंच गणपती विसर्जनाची मिरवणूक पार पडली. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी डीजे (DJ)डॉब्लीचा (Dolby) दणदणाट ऐकायला मिळाला. त्याच्या आवाजाने काही जणांचा जीव गेला तर अनेकांना कायमचं बहिरेपण आल्याच्या बातम्या आल्या. डीजेच्या आवाजाचा अनेकांना त्रास होतोय, त्याचा परिणामही अनेकांवर होतोय, आपलं कुठेतरी चुकतंय अशा आशयाची व यावर विचार करायला लावणारा पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांनी ट्विटरच्या(Viral Tweet) माध्यमातून लिहिली आहे. याबाबत लवकरच ते सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. पण एकूण सरकारने आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन यावर विचार आणि कृती करायला हवी असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

आपल्या उत्सवाची आणि आनंदाची किंमत आपण मोजतोय असं म्हणत सणांच्या मिरवणुकांतील डीजे, डॉल्बीवर (Dolbi) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) बोट ठेवलं आहे. उत्सव, आनंद साजरा व्हायलाच पाहिजे, पण माफक प्रमाणात डीजेच्या आवाजाचा अनेकांना त्रास होतोय, त्याचा परिणामही अनेकांवर होतोय, आपलं कुठेतरी चुकतंय याचा विचार करायला लावणाऱ्या गोष्टी घडत असल्याचेही राज ठाकरे आपल्या पोस्ट मध्ये म्हणाले आहेत.

(हेही वाचा : Instagram Reels : रिल्समध्ये पोलिसांविषयी अपशब्द; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल)

डीजे,डॉल्बीच्या आवाजांमुळे अनेकांना त्रास झाला. आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा आणि इतर धर्मातील उन्मादावर मौन बाळगायचं अशी एक जमात आपल्याकडे आहे. त्यांचा मुखभंग आम्हीच केला आहे. त्यामुळे धर्माभिमान इत्यादी गोष्टी आम्हाला कोणी शिकवू शकत नाही हे नक्की. पण, गणेश उत्सवात १० दिवस आणि मुख्यतः मिरवणुकांच्या वेळेस डीजे, डॉल्बी यांच्या आवाजच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणं आणि मृत्यू येणं किंवा बहिरेपण येणं किंवा मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढले आहेत.

सलग २४ तास आवाज कानावर पडून अनेकांची श्रवण शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको. तर “त्यातच एक बातमी आली की एका कुटुंबात एका तरुणाचा मृत्यू झाला होता, आणि त्या घराच्या बाहेर सुरु असलेला डीजेचा आवाज कमी करा सांगितलं म्हणून राग येऊन त्या घरातील लोकांना मारहाण झाली. ही घटना एखादीच असेल, त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा करण्याचं कारण नाही. पण कुठेतरी आपलं चुकतंय ह्याचा विचार करायला लावणारी नक्कीच आहे असेही त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.