घाबरू नका..! सत्तेच्या खुर्चीवर मी बसणार नाही, तुम्हालाच बसवेन; राज ठाकरेंची कोपरखळी

164

मी स्वतः सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणाऱ्यातला नाही. मी फक्त आणि फक्त तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार, अशी कोपरखळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना मारली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी करा, असे आवाहन मनसैनिकांना केले.

(हेही वाचा – मुंबई ते उरण फक्त ३० मिनिटांत प्रवास; मोरा जेट्टीच्या कामाला १५ दिवसांत होणार सुरूवात)

राज ठाकरे म्हणाले की, लवकरच आपण सत्तेच्या खुर्चीवर बसू. आपल्यातील एकजण त्या खुर्चीवर असेल. पण तो मी नसेन. यापूर्वी जी विधाने आणि बातम्या माध्यमांत आल्या, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. आपण स्वबळावरच निवडणुका लढवणार आहोत. सध्याच्या घडामोडींमुळे शिवसेनेला सहानुभूती मिळतेय, हा भ्रम आहे. या घाणेरड्या राजकारणाला पर्याय म्हणून मतदार आपला विचार करतील. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचा, असेही त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.

कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

राज ठाकरे यांनी या मेळाव्यात ‘सहा एम’चा फार्म्युला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मेक्यॉनिझ; या सहा ‘एम’वर काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मेक्यॅनिझ म्हणजे टेक्नॉलीजीचा वापर करा, मेसेज म्हणजे पक्षाचे विचार मेसेंजरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा. निवडणुकीसाठी पैसा लागतोच, तो कुठून तरी उभा करून आपण निवडणुका लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.