राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमच्या समुद्रातील बेकायदा बांधकाम हटवणार! जिल्हाधिकाऱ्यांनी पथक नेमून दिले कारवाईचे आदेश

163

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत स्क्रिनवर माहीमच्या समुद्रातील बेकायदा जागेची माहिती देत प्रशासनाला इशारा दिला. तसेच महिन्याभरात हे बांधकाम हटवले नाहीतर आपण त्या शेजारी सर्वात मोठे गणपती मंदिर बांधू असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. मनसे अध्यक्षांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर याठिकाणी चौकशी पथक जिल्हाधिकाऱ्यांनी नेमले आहे.

( हेही वाचा : सोशल मीडियावर ‘हे’ शब्द वापरत असाल…तर सावधान! होऊ शकते कारवाई )

या जागेची पाहणी करण्यासाठी सहा जणांचे पथक नेमण्यात आले आहे. पाहणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू होणार आहे. माहीम येथील समुद्रात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम पाडावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यावर गुरूवारी सकाळी हे सहा जणांचे पथक ८ वाजता माहीम येथील दाखल होणार आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येईल. या अनधिकृत बांधकाम संदर्भात राज ठाकरे यांनी आपल्या सभेत उल्लेख जारी करून चित्रफीत दाखवली. १२ तासात या अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. माहीम दर्गाच्या मागे काही वर्षांपासून समुद्रात नवीन हाजीअली तयार करण्याचे काम सुरू होते असा आरोप राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत केला होता.

नेमले पथक

New Project 38

दरम्यान मेरी टाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दर्गाच्या ठिकाणी पाहणी करून संपूर्ण मॅपिंग प्रक्रिया करण्यास सुरूवात केली आहे. हे बांधकाम केवळ १-२ वर्षांचे नव्हे तर खूप वर्षांपूर्वींचे आहे असे काही जणांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.