मनसेचा राऊतांना इशारा! “संपादक जेलमध्ये जाणार….”

144

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यातील उत्तरसभेत केलेल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत यांच्या शिवराळ भाषेवरून राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं. राज ठाकरेंच्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात एकच प्रतिक्रिया उमटू लागल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांच्या या टीकेला राऊत यांनी अगदी मोजक्या शब्दात उत्तर दिले आहे. “दिवा विझताना मोठा होतो, हे आज पुन्हा दिसले. जय महाराष्ट्र.” असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. यालाच आता मनसेने प्रत्युत्तर दिले आहे.

मनसेने दिलं प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या उत्तर सभेनंतर विरोधकांकडून टिप्पणी होत असून मनसे आणि शिवसेनेत ट्विटर वॉर होत असल्याचे दिसून आले आहे. ठाण्यातील राज ठाकरेंच्या भाषणानंतर संजय राऊतांना राज ठाकरेंविरोधात ट्वीट करून निशाणा साधला होता. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले असून संजय राऊतांच्या ट्वीटला उत्तर दिले आहे. “संपादक जेलमध्ये जाणार म्हणून भर पत्रकार परिषदेत शिव्या घालतो ही नवी म्हण आहे,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

(हेही वाचा – सुळे, पाटील, भुजबळ, पवार; राष्ट्रवादीच्या नेत्यांवर राज ठाकरेंचा ‘वार’ )

काय म्हणाले राज ठाकरे?

गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंग्यांचा मुद्द्यावर बोलणाऱ्या राज ठाकरेंवर संजय राऊतांनी टीका केली होती. ‘शिवाजी पार्कात भाजपचे भोंगे वाजत होते,’ असं म्हणणाऱ्या संजय राऊतांना राज ठाकरेंनी मंगळवारी ठाण्यात पुन्हा डिवचलं. प्रबोधनकार ठाकरेंचा दाखला देत राज ठाकरेंनी राऊतांचा उल्लेख लवंडे असा केला आहे. त्याला राऊतांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. काय तरी पत्रकार परिषदेतली भाषा. वर्तमानपत्राचा संपादक पत्रकार परिषदेत येऊन भ**, चु** शब्द वापरतो. अंगाशी आलं म्हणून हे होतं आहे. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी शब्द काढला होता. हे सगळे ‘लवंडे’… म्हणजे काय? पूर्वी जेवायला पत्रावळ्या असायच्या. त्यातला द्रोण वरण-आमटी पडली की लवंडायचे. तसे हे लवंडे.. शिवसेनेकडून पडलं की तिकडे लवंडायचे, राष्ट्रवादीकडून पडले की तिकडे लवंडायचे, असे देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

राऊतांचा ट्विटवरून मनसेला निशाणा

दरम्यान, यावर संजय राऊतांनी ट्वीट करून प्रत्युत्तर दिले असून दिवा विझताना मोठा होतो हे आज पुन्हा दिसले! जय महाराष्ट्र!” असे ट्वीट संजय राऊतांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.