“आदर देतोय तर घ्या, अन्यथा…”, शरद पवारांना ‘मनसे’ने दिला प्रेमळ इशारा

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार पक्ष बांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेवर मनसेने चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना मनेसेने त्यांच्या स्टाईलने इशारा दिला आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट केले आहे.

ट्वीटच्या माध्यमातून पवारांना प्रत्युत्तर

शरद पवारांच्या टीकेला उत्तर देताना  कल्याणमधील मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या ट्वीटमध्ये असे म्हटले की, आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा….बोटं तोंडात घालाल. आम्ही ‘धन’से कमी आहोत, पण ‘मनसे’ लई आहोत. #मौका_सभी_को_मिलता_है… आदर देतोय, आदर घ्या.

काय म्हणाले होते शरद पवार

शिवसेना ही शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील मांजर बनली आहे. दसरा मेळाव्यातही शरद पवारांचेच विचार मांडले जातील, अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली होती. मनसेने केलेल्या या टीकेवर शरद पवार म्हणाले होते की, ज्यांना विधीमंडळात बोटावर मोजण्याइतपतही आमदार निवडून आणता येत नाही, त्या पक्षाबाबत काय भाष्य करायचे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here