मनसेच्या संदीप देशपांडे यांना अटक पण…

77

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे हे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाले होते. यावेळी पळ काढताना एक महिला पोलीस देखील जखमी झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. या प्रकारानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पोलीस देशपांडे यांना शोधत होते. तत्काळ कारवाई करत त्यांच्या वाहनचालकाला पोलिसांनी अटक केली. मात्र संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे गायब होते. मात्र सोमवारी, २३ मे रोजी त्यांना अटक करून पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केल्यानंतर १५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना सोडण्यात आले आहे.

(हेही वाचा – अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट)

या दोघांच्या अटकपूर्व जामिनाला मंजूरी देताना सत्र न्यायालयाने सांगितले होते की, अटक झाल्यास १५ हजारांच्या जातमुचलक्यावर तत्काळ सुटका करावी. त्यांनतर संदीप देशपांडेंसह धुरी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

आंदोलनादरम्यान शिवतीर्थ या निवास्थानाबाहेर पोलिसांकडून धरपकड होणार असे लक्षात येताच, देशपांडे आणि धुरी आपल्या गाडीत बसून पळाले होते. यावेळी त्यांच्या वाहनाचा धक्का लागून एक पोलीस महिला खाली पडली आणि जखमी झाली. देशपांडे, धुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हेतूत: हे कृत्य केले, असा आरोप यावेळी पोलिसांकडून करण्यात आला होता. यानंतर या मनसे नेत्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या दोघांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. हा जामीन अर्ज मंजूर झाल्यामुळे देशपांडे आणि धुरींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.