काय सांगताय… आता मंत्रालयाचा नवा पत्ता ‘शिवतीर्थ’!

मनसेची शिवसेनेवर खोचक टीका

69

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या आजारी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मानेच्या दुखण्यावर गेल्या महिन्यामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री गैरहजर असल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात जाऊन काम करत नसल्यामुळे मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री असल्याचे वारंवार माध्यमातून दिसून येत आहे.

असं आहे ट्विट

मनसे नेते संदिप देशपांडे यांनी मुख्यमंत्री मंत्रालयात जात नसल्यामुळे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. देशपांडे यांनी ट्विट केलं असून यामध्ये एक फोटो आणि मजकूर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मंत्रालयातील मुख्यमंत्री दालनाचे चित्र दिसत आहे. तसेच तीन वर्षांचा कालावधी दाखवला असून कार्यालय बंद असल्यामुळे धूळ बसलेली आणि जळमटं लागल्याचे दाखवले आहे. तसेच मजकूरामध्ये म्हणूनच मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ आहे. असल्याची खोचक टीका मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केली आहे.

(हेही वाचा – मुंबई महापालिकेत कोरोना! १८ दिवसात १७२ कर्मचारी, अधिकारी बाधित)

मंत्रालयाचा नवा पत्ता आधी कृष्णकुंज आता शिवतीर्थ

गेल्या वर्षात कोरोना महामारीत मुख्यमंत्री राज्याचे काम त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानातून करत होते. दरम्यान, राज्यातील जनता त्यांचे प्रश्न घेऊन थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे जात होते. म्हणूनच मंत्रालयाचा नवीन पत्ता आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ आहे, असे ट्विट मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी केले असून त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.