‘सामना’कार रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना! मनसेची खोचक टिका

132

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत चांगलेत टार्गेट बनले, भाजप नेते मोहित कंबोज यांनी सर्वात आधी संजय राऊत यांच्याविरोधात ट्विट करून टीका केली होती, त्यांत आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. त्यासंबंधीचे ट्विट त्यांनी केले आहे.

झुकेगा नहीं साला

पाच राज्यांपैकी ४ राज्यांत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे भाजपचे कौतुक होत आहे. त्याबरोबर निवडणुकीच्या याआधी भाजपवर जोरदार टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत हेही आता लक्ष्य बनले आहेत. त्यांच्याविरोधात टीका होवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेनेही यात उडी घेतली आहे. मनसे नेते संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर ‘सामना कार; रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थ साठी रवाना. झुकेगा नहीं साला, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

(हेही वाचा “‘त्या’ स्टिंग प्रकणातील माहितीचा स्त्रोत देण्यास मी बंधनकारक नाही”)

मोहित कंबोज यांनीही केली टीका 

अपना हार्मोनियम पैक कर लो सलीम भाईभाजप नेते मोहित कंबोज यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. जावेद भाई अपना हार्मोनियम पैक कर लो सलीम भाई को गाना सुनना हैं, सलीम-जावेद का साथ टूटने नहीं देंगे!, असे ट्विट मोहित कंबोज राऊतांना उद्देशून केले होते. मोहित कंबोज सुरुवातीपासूनच नवाब मलिक आणि संजय राऊतांचा उल्लेख जावेद सलीम असा करतात. त्यापैकी नवाब मलिक आता ईडीच्या कोठडीत आहेत. संजय राऊतांनी हार्मोनियम पॅक करावे कोठडीत मलिकांना गााणे ऐकवायचे आहे. अशा अर्थाचे मोहित कंबोज यांनी केल्याने ट्विट आता चांगलेत व्हायरल होत आहे. यामुळे आता संजय राऊत यांना अटक होणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.