25 वर्ष मुंबईची तुंबई होतेय आम्हाला सहानुभूती कधी मिळणार? मनसेचे उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र

142

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्र लिहित मुंबईतील खड्डे आणि कोरोना काळांतील उपयोजनांबाबत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ‘आमदार फुटले तुम्हाला सहानुभूती, तुम्ही मुख्यमंत्री पद गमावलं तुम्हाला सहानुभूती, तुमचं चिन्ह गेलं तुम्हाला सहानुभूती, ठीक आहे पण आम्ही गेली 25 वर्ष रस्त्यात नाही खड्यात चालतोय आम्हाला सहानुभूती कधी मिळणार?’ असा खोचक सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे केला आहे.

( हेही वाचा : World Food Day : सकाळी नाश्ता करताना हे पदार्थ खाताय? तर सावधान!)

संदीप देशपांडेंचे पत्र जसेच्या तसे…

तुमचे आमदार फुटले तुम्हाला सहानुभूती, तुम्ही मुख्यमंत्री पद गमावलं तुम्हाला सहानुभूती, तुमचं चिन्ह गेलं तुम्हाला सहानुभूती,ठीक आहे पण आम्ही गेली25 वर्ष रस्त्यात नाही खड्यात चालतोय आम्हाला सहानुभूती कधी मिळणार?25 वर्ष मुंबईची तुंबई होतेय आम्हाला सहानुभूती कधी मिळणार?? कशाची सहानुभूती पाहिजे तुम्हाला? कोरोना काळात लपून बसलात त्याची की पन्नास लाखांचं घड्याळ मिळालं त्याची? महापौरांच्या मुलाला कोरोना काळात कंत्राट दिलं त्याची सहानुभूती पाहिजे की, लोकांचे करोना मध्ये हाल होत असताना रात्री उशिरापर्यंत पबला परवानगी दिलीत त्याची सहानुभूती पाहिजे? असा खोचक सवाल संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहित केला आहे.

कोरोना मध्ये जनतेला रुग्णालयात बेड मिळत नव्हता त्याची सहानुभूती पाहिजे की सामान्य माणसाला हॉस्पिटल्सने बिलांमध्ये लुटलं त्याची सहानुभूती पाहिजे? रेल्वेमध्ये सामान्य माणसाला प्रवेश न देता आठ – आठ तास प्रवास करायला लावला त्याची सहानुभूती पाहिजे? कोरोना मध्ये लोकांना उपाशी राहायला लागलं त्याची सहानुभूती पाहिजे की शिवभोजनच्या नावाखाली भ्रष्टाचार झाला त्याची सहानुभूती पाहिजे? पत्राचाळीच्या घोटाळ्यात शेकडो मराठी माणसं बेघर केलीत त्याची सहानुभूती पाहिजे? बार मालकाकडून शंभर कोटी वसूल केलेत त्याची सहानुभूती पाहिजे की वाझे सारख्या अधिकाऱ्याला परत आणलंत त्याची सहानुभूती पाहिजे? बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला हडप केलात त्याची सहानुभूती पाहिजे की त्याच्याच बाजूला असलेल्या महाराष्ट्र दालनाची दुरावस्था झाली आहे त्याची सहानुभूती पाहिजे?अनधिकृत भोंग्यांविरुद्धय आंदोलन करण्याऱ्या महाराष्ट्र सैनिकांना तडीपार केलंत जेल मध्ये टाकलेत त्याची सहानुभूती हवीय की स्वतःच्याच भावाचे अमित आजारी असताना नगरसेवक चोरलेत त्याची सहानुभूती हवीये ? वरळीत केम छो वरळीचे बोर्ड लावलेत त्याची सहानुभूती हवी की चतुर्वेदींना खासदार केलंत त्याची सहानुभूती हवीये? गेली पंचवीस वर्षे महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरलीत त्याची सहानुभूती हवीय ? की, सगळे अमराठी भ्रष्टाचारी कंत्राटदार महापालिकेत पोसलेत त्याची सहानुभूती हवीये उद्धव साहेब एकदा मराठी माणसाला समजून सांगाच तुम्हाला कसली सहानुभूती पाहिजे? असे पत्र लिहित मनसे नेते संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.