शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहे. अशापरिस्थितीत शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे उद्धव ठाकरे हे मुख्य संपादक तर संजय राऊत हे कार्यकारी संपादक आहे. मात्र आता राऊत कोठडीत असल्याने त्यांची भूमिका कोण पार पाडत असेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अशातच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी आहेत का असा प्रश्न उपस्थित केला आहे.
(हेही वाचा – टॅटू काढताय? सावधान! एकच सूई वापरल्याने १४ जणांना HIV चा संसर्ग)
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात रविवारचा रोख-ठोक संजय राऊतांच्या नावाने लिहिण्यात आला आहे. यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतल्याचे दिसतेय. दरम्यान, राऊत ईडीच्या कोठडीत असतानाही त्यांच्या नावाने रोख ठोकचा लेख पाहिला असताना राजकीय वर्तुळात अनेक सवाल उपस्थित होत चर्चांना उधाण आले आहे.
काय केलं ट्वीट
संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत रोख ठोकवर प्रश्न उपस्थित केला असून शंका व्यक्त केली आहे. आज सामना मध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत?, असा सवाल देखील त्यांनी यामध्ये विचारला आहे.
(हेही वाचा – Indian Railway: हिवाळ्यात ट्रेनची AC बंद असते, तरीही रेल्वे त्यासाठी शुल्क आकारते! पण का…?)
आज सामना मध्ये संजय राऊत यांच रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की त्यांना जेल मधून लेखनाची परवानगी मिळावी की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहीत आहेत?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 7, 2022