मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर मनसेला आठवली ‘दुनियादारी’!

114

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्या कंपनीच्या ११ सदानिका जप्त करण्यात आल्या आहेत. यानंतर ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरून टीका केली जात असताना सत्ताधाऱ्यांकडून मात्र केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. अशातच आता मनसेकडूने देखील या मुद्द्यावर टोला लगावला आहे. मनसेकडून शिवसेनेला टोला लगावण्यात आला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले असून त्यांना ‘दुनियादारी’ आठवल्याचे दिसतेय.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुनियादारी या मराठी चित्रपटाचा ‘मेहुणे मेहुणे, मेव्हण्यांचे पाहुणे’ हा डायलॉग ट्विट केला आहे. तसेच पाहुणे घरापर्यंत आले असल्याचा इशारा संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे. या सर्व प्रकरणानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.

(हेही वाचा – हाजीर हो! ‘या’ प्रकरणी सलमान खानला न्यायालयाचं समन्स)

म्हणून करण्यात आली कारवाई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या ११ सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. ठाण्यातल्या वर्तकनगर या उच्चभ्रू भागात असलेल्या निलांबरी अपार्टमेंट्समध्ये या ११ सदनिका आहेत. हा साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. चा प्रकल्प असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. काळा पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाकडे वळवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. यातून ही कारवाई करण्यात आली. निलांबरी अपार्टमेंट प्रकरणात ईडीकडून श्रीधर पाटणकर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता असून त्यावरून आता विरोधकांकडून टीका केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.