एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’ झाल्यानंतर ‘मनसे’ची पोस्ट, ‘लक्षात आहे ना?’

160

विधान परिषद निकालानतंर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १२ हून अधिक आमदार शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. इतकेच नाही तर राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिंदे यांच्यासह ११ ते १२ आमदार निकालानतंर रातोरात नॉटरिचेबल झाले आणि सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असलाचा दावादेखील केला जात आहे. अशातच मनसेचे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोणतं आहे व्हायरल होणारं ट्विट

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मंगळवारी सकाळी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी लक्षात आहे ना? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. या ट्विटमध्ये देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या पत्रातील शेवटचा मजकुराचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये, राज्य सरकारला माझं एकच सांगण आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणही सत्तेचा ताम्रपाट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे तुम्हीही नाही! असे पत्रामध्ये म्हटले आहे. या पत्राअखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची स्वाक्षरी देखील दिसत आहे.

(हेही वाचा – राजकीय भूकंप? शिवसेनेचे ‘हे’ आमदार आहेत Not Reachable!)

आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार की नाही

सोमवारी रात्री एकनाथ शिंदेंसह ११-१२ आमदार सूरतच्या या हॉटेलमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी गुजरातच्या एका वरिष्ठ नेत्यासह गुप्त बैठकही केली. तसेच, या हॉटेल बाहेर सुरक्षा पोलीस तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह हे सर्व आमदार शिवसेनेवर नाराज आहेत. त्यामुळे ते नॉट रिचेबल होऊन थेट गुजरातला दाखल झाले आहे. अशातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघारी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावले आहे. शिवसेनेतर्फे तातडीने मंगळवारी एक बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, विधान परिषद निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असून शिंदे यांच्यासह या सर्व आमदारांचे कालपासून फोन नॉट रिचेबल आहे. ते गुजरातमध्ये असल्याने आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष्य लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.