पाटी बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा? मनसेचा व्यापाऱ्यांना सूचक इशारा

88

राज्यातील दुकानांवरच्या पाट्या या मराठीतून असाव्यात, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्यामुळे मराठी मनं सुखावली आहेत. बुधवारी झालेल्या या निर्णयाचे आता पडसाद उमटताना दिसत आहेत. मराठी पाट्या लावण्याला अनेक व्यापारी संघटनांनी विरोध केला. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली होती, आता याच मुद्दयावरुन मनसे आक्रमक झाली असून, पाट्या बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा? असा खोचक प्रश्न करत  मनसेने आपल्या मनसे स्टाईलने व्यापा-यांना सूचक इशारा दिला आहे.

मनसेचा इशारा

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करत या निर्णयाचे श्रेय मनसेचे असल्याचे गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. तर आता मराठी पाट्या कराव्यात अशी मनसेचीही मागणी आहे. व्यापाऱ्यांनी यावर विरोध दर्शवला आहे. परंतु पाटी बदलण्याचा खर्च जास्त आहे की, दुकानाच्या काचा बदलण्याचा खर्च जास्त आहे. असा सूचक इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत  दिला आहे.

( हेही वाचा :पंतप्रधान म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत घरगुती, आयुर्वेदिक उपचार महत्वाचे! )

राऊतांचे खडेबोल

याआधी संजय राऊत यांनीही विरोध करणा-यांना खडे बोल सुनावले होते. विरोध करत असतील, तर त्यांना सरळ विरोध करू द्या. विरोध करतो म्हणजे काय… राज्याने हा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र किंवा मग कर्नाटक प्रत्येक राज्याला अधिकार आहे.  प्रत्येक राज्याचा, त्या त्या भाषेचा तो अधिकार आहे. त्यामुळे विरोध कसला करताय? तुम्हाला मुंबईत आणि महाराष्ट्रात राहायचंय हे विसरू नका. तुम्हाला इथेच राहून व्यापार करायचा आहे. उद्योगधंदा करायचा आहे. त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही म्हणजे काय… त्यांना ते करावंच लागेल. कारण हा कोणताही राजकीय निर्णय किंवा राजकीय भांडण नाहीये, असे म्हणत राऊतांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.