BMC ने पाठीत खंजीर खुपसलं! शिवाजी पार्कातील ‘त्या’ काँक्रीटीकरणावर मनसे आक्रमक

143

सध्या छत्रपती शिवाजी महाराज उद्याना (शिवाजी पार्क) त मध्यभागी मातीचा उपसा करून खडी, दगड टाकण्यात आले आहेत. त्यामुळे खरंच शिवाजी पार्कच्या मध्यभागी कॉंक्रिटचा रस्ता बांधला जात आहे का, अशी चर्चा जोरदार सुरू झाली आहे. यासह शिवाजी पार्क मैदानाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र यामध्ये खडीचा वापर होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. शिवाजी पार्कमधील खडीच्या रस्त्यावरुन मनसे विरुद्ध शिवसेना आमने-सामने आले आहे. मनसेच्या वतीने महापालिकेच्याविरोधात बुधवारी सकाळी या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी मनसैनिकांसह नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार यांना ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. यावेळी महापालिकेने पाठीत खंजीर खुपसले, असा घाणाघात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे

पाठीत खंजीर खुपसणं काय असतं, हे बृहन्मुंबई महापालिकेकडून शिकायला हवं. मंगळवारी शिवाजी पार्कमध्ये खडी टाकणार नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आणि त्यानंतर पार्कातील खडी उचलून नेली. मात्र रात्री पुन्हा एकदा खडी टाकून त्यावर पांढऱ्या रंगाचे कापड अंथरून त्यावर लाल माती टाकली. पालिकेच्या या प्रकारामुळे नागरिकांची महापालिकेकडून फसवणूक केली जात असल्याची टिका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

(हेही वाचा – “भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकलंय का?” राऊतांचा सवाल)

बृहन्मुंबई महापालिका आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा निषेध करायला हवा. शिवाजी पार्क प्रेमींना, खेळाडूंनी देखील याचा निषेध करायला हवा. महापालिकेच्या या कामाने निर्लज्जणाचा कळस गाठला असल्याची भावना देखील संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे. यासह मनसेने पार्कात खडी नसावी, यासाठी एकत्र यायले हवे. यावेळी त्यांनी शिवाजीपार्क वासियांना अशीही विनंती केली की, रात्रीच्या वेळी ही खडी टाकण्यात आली, त्या प्रकाराचा निषेध करावा.

पार्कात मनसेसैनिकांचं ठिय्या

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या ठिकाणी दौरा केला असता या ठिकाणी सिमेंटचा रस्ता असणार नाही, अशी ग्वाही दिली होती मात्र शिवाजी पार्कचे नुतनीकरण सुरू असताना मैदानात खडी टाकून त्यावर माती टाकण्याला मनसेने विरोध केला होता. यासाठी मनसेसैनिकांनी, नेत्यांनी या ठिकाणी मंगळवारी रात्रभर ठिय्या मांडला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत पालिका प्रशासनाने बैठक घेतली होती. त्यावेळी खडी ऐवजी ब्रिक्सचा वापर करणार असल्याचे कबूल केल्यानंतर मध्यरात्री पालिकेने खडी टाकून त्यावर कपडा अंथरून झाकण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच मनसे आणि स्थानिक नागरिकांनी काम थांबवत आंदोलन सुरू केलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.