‘हिमालयातून आलेल्या राज्यपालांना कळावं म्हणून…’, मनसेने राज ठाकरेंच्या आवाजात प्रसिद्ध केलेला व्हिडिओ नक्की बघा

178

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आता मनसेकडून खास राज ठाकरे यांच्या आवाजातील एक चित्रफीत ट्वीट करण्यात आली आहे.

त्यामध्ये त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतानाच हिमालयातून आलेल्या महामहिम राज्यपालांना कळावं ह्यासाठी ही चित्रफीत असल्याचे मनसेने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

मनसेने ट्वीट केला व्हिडिओ

काल-आज आणि उद्याही हिमालयाच्या मदतीला धावून जाणाऱ्या सह्याद्रीची प्रेरणा ‘छत्रपती शिवाजी महाराज’च होते आणि अखंड राहतील, हे हिमालयातून आलेल्या महामहिम राज्यपालांना कळावं ह्यासाठी ही चित्रफीत आहे, असे ट्वीट करत मनसेने राज ठाकरे यांच्या आवाजातील व्हिडिओ शेअर केला आहे.

(हेही वाचाः ‘दोन महिन्यात राज्यात काय होईल हे सांगता येणार नाही’, भाजपच्या मंत्र्याच्या विधानाने खळबळ)

भाजपनेही स्पष्ट केली भूमिका

राज्यपालांच्या विधानावरुन भाजप नेत्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी आपण राज्यपालांच्या विधानाशी पूर्णपणे असहमत असल्याचे सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना जगात कोणाशीही होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. तजोपर्यंत पृथ्वीवर सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी आदर्श राहतील, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.