पुणे शहरात रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीतून मनसे नेते वसंत मोरे यांचे नाव वगळण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसंत मोरे हे कोअर कमिटीचे सदस्य असतानाही त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. हे नाव वगळल्याने त्यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे प्रकरण?
आज रविवारी पुण्यात मनसेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी तयार केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यांना या कार्यक्रमातून वगळण्यात आल्यावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचा- …तर बाळासाहेबांनी अशा लोकांना जमिनीत गाडले असते, राणांचा मुख्यमंत्र्यावर संताप)
काय म्हणाले वसंत मोरे?
वसंत मोरे म्हणाले, शनिवारी रात्री उशीरा माझ्या हातात कार्यक्रम पत्रिका आली. या कार्यक्रम पत्रिकेत ११ जणांची कोर कमिटी आहे पण प्रत्यक्षात १० जणांची नावे आहेत, त्यामध्ये माझे नाव देण्यात आले नाही. त्यामुळे मी या मेळ्याव्याला जाणार का नाही याचा निर्णय अद्याप घेतला नाही. दरम्यान पुढे ते असेही म्हणाले की, हा विषय मुद्दाम केला गेला आहे. अशा कार्यक्रमातून मला लांब ठेऊन राज साहेबांच्या मनात माझ्याविषयी राग निर्माण झाला पाहिजे म्हणून अशा गोष्टी केल्या जात आहेत. ही गोष्ट अजून मी राज साहेबांपर्यंत पोहचवली नाही. पण ही गोष्ट शहरातील वरिष्ठ लोकांपर्यंत पोहचवली आहे. राज साहेबांच्या मागे खूप कामं आहेत, असल्या चिल्लर कामांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असे म्हणत त्यांनी शहरातील नेत्यांविषयी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community