मनसेच्या विद्यार्थी सेनेची कार्यकारिणी जाहीर, सरचिटणीस पदी गजानन काळे, अखिल चित्रे

109

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेची कार्यकारिणी बुधवारी, १८ मे रोजी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सरचिटणीसपदी नवी मुंबईचे गजानन काळे यांची निवड करण्यात आली आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जाहीर केलेल्या कार्यकारिणीत ५ सरचिटणीस, ५ प्रमुख संघटक आणि २ सचिव यांची नियुक्ती केली आहे. ही नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी असून सर्वांचा कार्य अहवाल पाहूनच त्यांना पुढील मुदतवाढी संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

(हेही वाचा ज्ञानवापी मशीद तेव्हाच जमीनदोस्त झाली असती, पण… )

कोणाची कोणत्या पदावर नियुक्ती? 

सरचिटणीस 

  • गजानन काळे
  • अॅड. सायली सोनावणे
  • संदिप पाचंगे
  • राजीव जावळीकर
  • अखिल चित्रे

प्रमुख संघटक 

  • सुधाकर तांबोळी
  • यश सरदेसाई
  • संतोष गांगुर्डे
  • चेतन पेडणेकर
  • प्रशांत कनोजिया

सचिव 

  • आशिष सावळे-पाटील
  • अॅड. अक्षय काशिद
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.