आम्हाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आज त्यांच्याकडे ना चिन्ह ना पक्ष; मनसेने सुनावलं

161

मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन एक पोस्ट शेअर करत, शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत हा टोला लगावण्यात आला आहे. “नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आदित्य ठाकरे आज पक्ष नसलेला माणूस झाले आणि चिन्हदेखील गमावण्याची वेळी आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले, म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये, शिल्लकसेना”! अशी पोस्ट मनसे वृत्तांत अधिकृत या पेजवरुन शेअर करण्यात आली आहे.

( हेही वाचा: Amarnath Cloudburst: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे 15 भाविकांचा मृत्यू; 40 बेपत्ता )

मनसेची फेसबुक पोस्ट

मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे आणि आदित्य यांच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत टोला लगावण्यात आला आहे. “नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आदित्य ठाकरे आज पक्ष नसलेला माणूस झाले आणि चिन्हदेखील गमावण्याची वेळी आल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले, म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये, शिल्लकसेना”! अशा आशयाची पोस्ट मनसेच्या अधिकृत पेजवरुन शेअर करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.