MNS vs UBT Group: ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्या 

201
MNS vs UBT Group: ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्या 
MNS vs UBT Group: ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्या 

बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) गाडीवर सुपाऱ्या फेकल्या होत्या. त्यानंतर शनिवारी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना महाराष्ट्रात मनसैनिक एकही सभा घेऊ देणार नाहीत, असा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या अवघ्या ८ तासांतच उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील शिवसंकल्प मेळाव्याच्या ठिकाणी मनसे कार्यकर्ते आणि उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा ताफा आला असता त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी शेण आणि बांगड्या फेकल्या. त्यामुळं हे प्रकरण अजूनच पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (MNS vs UBT Group)

(हेही वाचा – Bangladesh Interim Government : बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान शरद पवार यांचे मित्र!)

ठाण्यातील शिवसंकल्प मेळाव्याच्या (Shiv Sankalp Melawa) ठिकाणी मनसेचे ५० ते ६० कार्यकर्ते या ठिकाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. तसेच महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. मनसेचे कार्यकर्ते ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसले आणि त्यांनी शिवसेनेचा बॅनरही फाडला. या प्रकारानंतर शिवसैनिकही त्याठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. 

उबाठा गटाचा शनिवारी ठाण्यातील रंगायतनमध्ये मेळावा होता. त्यासाठी उद्धव ठाकरे हे येत असताना त्यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी शेण आणि बांगड्या फेकल्या आणि नंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत थेट रंगायतनमध्ये घुसले. त्यानंतर गोंधळ घालायला सुरूवात केली.

(हेही वाचा – ISIS Pune Module च्या प्रमुख सदस्याला अटक, ‘या’ दहशतवाद्यावर होते ३ लाखांचे बक्षीस)

राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर (MNS Marathwada) असताना त्याचा ताफा अडवून शिवसैनिकांनी त्यांच्यासमोर सुपाऱ्या फेकल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलं. 

जशास तसं उत्तर देणार

राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपारी फेकल्याने शनिवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले. यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल असंही ते म्हणाले. 

ताफा अडवण्याचा मागचं कारण?

सोलापूर जिल्ह्यातून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. मात्र, या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे विधान राज ठाकरेंनी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच उबाठा व मराठा बांधवांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवला होता. (MNS vs UBT Group)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.