MNS Vs UBT : मनसेने आदित्य ठाकरे यांना ‘रस्त्यावर’ आणले!

261
MNS Vs UBT : मनसेने आदित्य ठाकरे यांना ‘रस्त्यावर’ आणले!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि संभाव्य उमेदवार संदीप देशपांडे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघात मतदारांना घरोघरी भेटी सुरू केल्याने हादरलेले वरळीचे आमदार आणि शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे अक्षरशः ‘रस्त्यावर’ आले आहेत. गेल्या १५-२० दिवसांपासून किमान एक दिवसआड ठाकरे वरळीत एखादी फेरी मारत रिबिन कापणे किंवा नारळ वाढवून जातात. काही दिवसांपूर्वी तर शौचालय दुरुस्तीच्या कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमाला ठाकरे यांनी हजेरी लावली. (MNS Vs UBT)

(हेही वाचा – Gallantry Award 2024: १०३ शौर्य पुरस्कार जाहीर, ४ कीर्ती आणि १८ शौर्य चक्र)

मनसेचा धसका

गेल्या १५-२० दिवसांपासून आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील भेटी वाढल्या असून निवडणूक जवळ आल्यामुळे ठाकरे यांना मतदारसंघाची आठवण झाली असावी, अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. कधी इमारतीच्या दुरुस्तीचा नारळ वाढवणे असो, नाहीतर मंदिराचे शेड, समाज कल्याण केंद्राचे लोकार्पण, बसथांबा शेड भूमिपूजन, ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन शेड भूमिपूजन, सहकारी गृहनिर्माण संस्था कार्यालयाचे लोकार्पण अशा कामांसाठी ठाकरे यांचे मतदारसंघात दर्शन होवू लागले आहे. काहीच नाही ५ ऑगस्टला गौतमी नगर येथील शौचालय दुरुस्तीच्या कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमाला ठाकरे यांनी हजेरी लावली, इतका धसका मनसेचा घेतल्याची चर्चा परिसरात होताना दिसते. (MNS Vs UBT)

(हेही वाचा – Independence Day : 78व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्राप्रती संदेश)

शिवडीपेक्षा वरळीच बरा

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभेसाठी नवा सुरक्षित मतदारसंघाच्या शोधत असल्याची चर्चा होती आणि त्यात शिवडी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, शिवडी मतदारसंघातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माजी आमदार बाळा नांदगावकर यांची उमेदवारी घोषित केल्याने नांदगांवकर विरुद्ध ठाकरे अशी लढत झाली असती. पण नांदगावकर यांच्याविरुद्ध लढण्यापेक्षा वरळी मतदार संघच बरा, असा विचार करून ठाकरे यांनी मतदारसंघ बदलण्याच्या भानगडीत न पडण्याचे ठरवले, असे समजते. (MNS Vs UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.